गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…
मुंबई : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले.
गौतमी म्हणाली, ‘मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलले तरी मला काही फरक पडत नाही. मी कसलीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक असून, तो मी पार पाडत असते. चांगला कार्यक्रम होत असतो. कोण मला नावे ठेवतो मला फरक पडत नाही. कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप असेल, प्रश्न असेल तर त्यांनी माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा त्यानंतर बोलावे.’
दरम्यान, ‘गौतमीचे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये, अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,” असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.