Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

नवी दिल्लीः एका पोलिसाने पळत जाऊन लाथ मारून स्कूटरवरून पळणाऱ्या दोन चोरांना पकडले आहे. सोमवारी सायंकाळी मॉडेल टाऊन मार्केट परिसरात पर्स हिसकावून दोन चोर वेगाने पळत असताना ही घटना घडली. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिल्ली पोलिसांच्या संपर्क शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक अजय झा घटनेच्या वेळी मॉडेल टाऊन मार्केटमधील एका दुकानात किराणा साहित्य खरेदी करत होते. पोलिसांनी सांगितले की, शेजारच्या दुकानात उभ्या असलेल्या अजय झा यांनी नागरिक ‘चोर, चोर’ असं ओरडत असल्याचे ऐकले. शिवाय, एका स्कूटरवरून दोन जण वेगाने निघाले असल्याचे त्यांनी पाहिले. एएसआय अजय झा यांनी पळत जाऊन दुचाकीवरील चोरट्याला लाथ घातली. त्यामुळे वाहनासह दोन्ही चोरटे जमिनीवर पडले. लाथ मारल्याने एएसआय झाही जमिनीवर पडले. त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला. दोन्ही चोरट्यांची ओळख पटली आहे. महेश आणि सिकंदर अशी त्यांची नावे आहेत. जमिनीवर पडल्यानंतर दोन्ही चोरटे उठून पळू लागले, मात्र जमावाने त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अजय झा यांच्या अंगठ्याला आधीच दुखापत झाली होती. घटनेपूर्वीच्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये अजय झा यांनी उजव्या हाताच्या अंगठ्यात सपोर्टर घातल्याचे दिसून येते. त्याचवेळी स्कूटरला लाथ मारल्याने ते उजव्या हातावर पडले, त्यामुळे त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्या धाडसी कृत्य जवळच्या दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…

Video: ‘मुळशी पॅटर्न’चा थरारानंतर पोलिसांनी काढली गुंडांची धिंड…

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!