
पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
पुणेः कोंढवे गेट येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन मुलांना भरधाव वेगात आलेल्या कारने जोरात धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. संबधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मनिष नवनाथ तावरे (वय 17) आणि अजिंक्य केदार पाटील (वय 17, दोघेही रा. कोंढवे धावडे) रात्री १०.३० च्या सुमारास रस्त्याने जात होते. अजिंक्य अरुण आघाडे (वय ३६) याने अतिशय वेगाने वाहन चालवून दोघांना मागून जोरदार धडक दिली. दोघांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्यातील अजिंक्य पाटील या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बेदकारपणे वाहन चालविणे आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक दिल्यानंतर आरोपीने जखमींना उपचारासाठी न नेता तसेच पोलिसांना अपघातासंबंधी माहिती न देता तेथून पळ काढला होता. अपघातासंबंधी नवनाथ मारुती तावरे यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
सदर गुन्ह्यातील वाहनाचा शोध घेण्यासाठी शिंदे पूल ते एमइएस गेट पर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अपघातास कारणीभूत असलेले वाहन लाल रंगाची मारुती ब्रिझा कार एम एस १२ व्ही व्ही ४१६३ हे शिवणे येथील स्नेहा विहार सोसायटी मधून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अजिंक्य आघाडे हा पार्सल आणण्यासाठी अंजनी हॉटेल येथे गेला असता वाहन वेगाने चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. अपघात झाल्याच्या २४ तासाच्या आत गुन्हेगाराला पकडण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, झोन तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त भिमराव टेळे, उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक युसुफ शेख, गुन्हे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जोशी, पोलिस हवालदार विनोद शिंदे, संग्राम केंद्रे, पोलिस नाईक हजारे, पाडाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
पुणे शहरात भीषण अपघातात एकाचा मृत्यू…https://t.co/42LUDp6Iqz#Pune #Accident #PoliceKaka pic.twitter.com/w92kP0Xjsf
— policekaka News (@policekaka) April 5, 2024
नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू…
पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…
Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

