जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…

पुणे: विवाहानंतर जेजुरी देवदर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी आलेल्या कुटुंबाची रिक्षा पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये पडल्यामुळे नवदाम्पत्यासह एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८), श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आदित्य मधुकर घोलप (वय २२) आणि शितल संदीप शेलार (वय ३५) हे जखमी झाले आहेत.

पुणे शहरातील धायरी येथून जेजुरी येथे देवदर्शनासाठी नवविवाहित दांपत्य रिक्षामधून (एमएच-१२ क्यूई ७७०६) आले होते. त्यांच्याबरोबर अन्य तिघे होते. जेजुरी देवदर्शन व कुलाचार करून परतणाऱ्या कुटुंबाची रिक्षा थेट विहिरीत कोसळली आणि या अपघातात नवदाम्पत्याचा व अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे शेलार कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, रिक्षा विहीरीत कोसळल्यानंतर मृत्यू डोळ्यासमोर दिसत आसताना दोघा जखमींनी हिंमत दाखवत विहिरीतील सळईला धरुन ठेवले होते. रात्रभर दोघेही सळईला लटकून होते. सकाळी त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केल्यानंतर घटनेची इतरांना माहिती होत मदत कार्य सुरु केले. दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, त्या दोघांना आपल्या प्रियजनांच्या मृत्यू जवळून पाहावा लागला आहे. सकाळी-सकाळी वाचवा वाचवा असा सकाळी जाणाऱ्या मुलांना विहिरीतून मदतीसाठी हाक ऐकू आल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सासवड पोलिसांना याबाबतची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी या दोघांसह इतर तिघांना भोर येथील रेस्क्यू टीम, जेजूरी व सासवड येथील अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांच्या साहय्याने क्रेनद्वारे बाहेर काढले. यातील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास भोर पुरंदरचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडे पोलिस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.

गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…

हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

हृदयद्रावक! पाच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या वनरक्षकाने घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!