धक्कादायक! भालाफेकीचा सराव करताना भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू…

रायगड : भालाफेकीचा सराव करत असताना डोक्याला भाला लागून शालेय विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. माणगांवच्या वणी येथील शाळेतील हा प्रकार समोर आला आहे.

वणी येथील आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूलमध्ये ही घडली घटना घडली आहे. भालाफेकीचा सराव करताना भाला थेट हुजाईफा दावरे या विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय स्पर्धेचे सराव सुरु होते. दरम्यान, भालाफेक खेळाचा सराव करताना ही दु: खद घटना घडली आहे. विद्यार्थाचा मृतदेह प्राथमिक तपासणीनंतर शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे पाठविण्यात आल आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगांव पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालाफेकीचा सराव करताना ही दुर्घटना घडली. भालाफेकीचा सराव करताना भाला डोक्याला लागून हुजाईफा दावरे या विद्यार्थ्याचा मृ्त्यू झाला आहे. तो इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. हुजाईफा दावरेने सराव करताना भाला फेकला. यानंतर समोरील विद्यार्थाने तो भाला उललला आणि परत हुजाईफा दावरेकडे फेकला आणि तो भाला मृत विद्यार्थाच्या डोक्याला लागला आणि विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

हृदयद्रावक! लातूरच्या अविष्कारने परीक्षा दिली अन् घेतला जगाचा निरोप…

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!