
पुणे! अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई करून येरवडा भागात २,८१,०००/-रु किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शिवाय, एन. डी. पी. एस गुन्हयातील पाहिजे आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे येरवडा पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार संदिप शेळके यांना मिळालेले बातमीवरुन
१) जगदिश भवानसिंग बारेला, वय १८ वर्षे, रा. मुपो दहिवत अमळनेर जिल्हा जळगांव महाराष्ट्र
२) पवन सुभाष बारेला वय २२ वर्षे, मुपो कलकुंटी ता वारला जिल्हा बरवानी मध्य प्रदेश यांच्या ताब्यात एकुण २,८१,०००/- रु. कि. चा १३ किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द येरवडा पोस्टे गु.र.नं.२०८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( ब ) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लष्कर पोलिस स्टेशन गुन्हा रजीस्टर नंबर ०८/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क),२९ मधील पाहिजे आरोपी नदिम मेमन हा कोंढवा मंडई जवळ पुणे येथे येणार असल्याची बातमी पोलिस अंमलदार साहिल शेख यांना मिळाल्याने सदर बातमीचे अनुषंगाने कोंढवा मंडई जवळ येथे सापळा रचून पाहिजे आरोपी नदिम मेमन ऊर्फ इब्राहिम अल्ताफ कच्ची (वय २५ वर्षे रा भाग्योदय नगर, किर्ती बिल्डींग, डि विंग प्लॅट नं ३ कोंढवा पुणे) यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकामी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे सहा पोलिस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस अंमलदार संदिप शेळके, साहिल शेख, प्रशांत बोमादंड्डी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
पुणे! IT इंजिनिअर युवतीवर मित्रांनी केला सामूहिक अत्याचार अन्…
पुणे! सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपीकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त…
पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…
पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…
पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…

