
दत्ता सामंत हत्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता…
मुंबई : कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे.
कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती. या प्रकरणी छोटा राजनला निर्दोष ठरवण्यात आले आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी होता. यापूर्वी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते. दत्ता सामंत हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टात आज (शुक्रवार) सुनावणी पार पडली. न्यायाधीश ए एम पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. प्रमाणित पुराव्यांच्या अभावी राजेंद्र निकाळजे अर्थात छोटा राजन निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. दत्ता सामंत पवई ते घाटकोपरच्या पंतनगर येथे जात असताना पद्मावती रोडवर त्यांच्यावर हल्ला झाला होता. पोलिसांच्या माहितीप्रमाणे 4 अज्ञात आरोपी बाईकवर आले होते. त्यांनी दत्ता सामंत यांची गाडी रोखली आणि त्यांच्यावर जवळपास 17 गोळ्या फायरिंग करून निर्घृण हत्या केली होती. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची दत्ता सामंत हत्या प्रकरणातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी होता. यापूर्वी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते.
पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…
पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…