वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे संकल्पनेतून व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या सहकार्याने पोलिस, सेवानिवृत्त पोलिस तसेच गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी (ता. २५) आयोजन करण्यात आले होते.
पोलिस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलिस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमांचे खासदार रामदास तडस वर्धा यांचे हस्ते तर कार्यक्रमाचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन व अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे तसेच ईला हायरींगव टेक्नॅालॅाजीचे अंकीत हिवर यांचे उपस्थितीत पार पडले.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. वर्धा जिल्हा तसेच नागपूर जिल्हयातील नामांकीत कंपन्या स्टेट बँक ऑफ इंडीया, इरॉस हयुदई, अॅबको कॉम्युटर, आरोही इंन्फो, वी फलायओरीयस टेक्नोलॉजी, एलआयसी, पटेल एंडस्कील फाउंडेशन, धूत ट्रांसमिशन, ईला हायरिंग टेक्नोलॉजी इत्यांदीनी उमेदवारांची मुलाखत घेवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. कार्यक्रमाअंती नूरुल हसन यांनी निवड झालेल्या एकूण २८ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप केले व इतर ५२ उमेदवार यांची अंतिम निवड कंपनीचे संचालकाकडून होणाऱ्या मुलाखाती करीता राखून ठेवण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांची काही कारणास्तव निवड होवू शकली नाही, अशांना सुद्धा आजचा अनूभव गाठीशी ठेवून पुनश्च: नवीन जोमाने व हिम्मतीने तयारी करण्याकरीता नूरुल हसन यांनी प्रोत्साहीत केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता राखीव पोलिस निरीक्षक कमलाकर घोटेकर, सपोनि.संदिप कापडे व कर्मचारी सायबर शाखा, वर्धा, सपोनि.लक्ष्मण लोकरे, व कर्मचारी पोलिस कल्याण शाखा, वर्धा यांनी प्रयत्न केले. रोजगार मेळाव्याकरीता उपरोक्त कंपनीचे प्रतिनिधी व एकुण ३०० उमेदवार यांनी उपस्थिती नोंदविली होती. असाच उपक्रम भविष्यात प्रत्येक जिल्हा पोलिस दलाने हाती घेतला तर निच्छितच पोलिस पाल्यांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे, असा विश्वास देखील आपल्या समारोपीय भाषणात पोलिस अधिक्षकांनी व्यक्त केला.
वर्धा सायबर पोलिस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड…
वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…
वर्धा पोलिसांचे पथक लपत छपत गेले अन् १७ जणांना रंगेहाथ पकडले; पाहा नावे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…