हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…

सातारा: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गुरुवारी (ता. ११) दुपारी एक थरकाप उडवणारा अपघात झाला. खासगी शिकवणीसाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांना उसाच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.

सारिका सुतार (रा. संगममाहुली, सातारा) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. ईश्वरी सुतार असे जखमी महिलेचे नाव आहे. मृत सारिका सुतार या अजंठा चौकातील एका खासगी क्लासमध्ये शिकवण्यासाठी जात होत्या. सारिका आणि ईश्वरी सुतार दुचाकीने अजंठा चौकाकडे जात असताना समोरून उसाचा ट्रॅक्टर आला. याचवेळी सर्व्हिस रोडवर येण्यासाठी एक क्रेटा कार अचानक पुढे आली. त्या कारला चुकवताना चालकाने ट्रॅक्टर उजवीकडे वळवला. त्यामुळे समोरून येणारी दुचाकी मोठ्या खड्ड्यात आदळली. त्या धक्क्याने दुचाकीवर मागे बसलेल्या सारिका सुतार खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे मागील चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी महिला जखमी झाली आहे.

दरम्यान, सारिका सुतार यांच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! बहिण-भावावर एकाचवेळी अंत्यसंस्कार, आई-वडिलांची भेट राहिली अधुरी…

हृदयद्रावक! शिक्षकांचा संप अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जागेवर जीव…

हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…

हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…

हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!