Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दुरावस्था; चालताही येईना…
मुंबईः भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांची स्थिती सध्या अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या विनोद कांबळी याला आज चालताही येईना. विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी यांना नीट चालताही येत नाही. एकेकाळी कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या विनोद कांबळींना आज एक-एक रुपया महाग झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, विनोद कांबळीला उभं राहण्यासाठी दुचाकी आणि चालण्यासाठी व्यक्तींचा आधार घ्यावा लागत आहे. जेव्हा ते चालायचा प्रयत्न करतात, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांना आधार दिला आणि उचलून आधार दिला आहे.
विनोद कांबळी लाना नेमकं काय झालं? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण, सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील काही दिवसांपासून विनोद कांबळींची प्रकृती बिघडलीय. काही दिवसांपूर्वी पांढरे केस आणि हात जोडत असलेला विनोद यांचा फोटो व्हायरल झाला होता. आपल्याकडे कोणताच जॉब नाही आणि त्यामुळे घर चालवणं कठीण होऊन बसलं आहे, असे त्यांनी म्हटले होते. एकेकाळी विनोद हे अनेकांच्या गळ्यातील ताईत होते. पण, आता त्यांच्यावर दारूच्या व्यसनामुळे ही वेळ आली आहे.
विनोद कांबळी आर्थिक संकटात सापडले असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पुढाकार घेत त्यांना मदत केली होती. सचिन यांनी त्यांची एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय ते मुंबई टी-२० लीगमध्ये टीमचे प्रशिक्षकही झाले. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदाची नोकरी गमवावी लागली.
Really feel sorry for our Vinod Kambli. @sachin_rt
Need help here. pic.twitter.com/d8E4jYklFe— Vinod Authentic Hindu (@Vinod__71) August 5, 2024
जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…
लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…
कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…