लव्ह जिहाद! पाकिस्तानातून होमगार्ड जवानाला आला फोन अन् म्हणाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका होमगार्डच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अपहरण केल्यानंतर तिला कर्नाटकात नेऊन तिचं बळजबरीने धर्मपरिवर्तन करण्यात आले व नंतर तिच्याशी निकाह केला गेला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना पाकिस्तानातील क्रमांकावरून धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक लव्ह जिहादची घटना बरेलीमध्ये घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बरेलीमधल्या एका मुलीचे धर्मांतर केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. भोजीपुरा येथील एक मुलगी 13 जुलै रोजी घरातून बेपत्ता झाली होती. तिचे अपहरण करून तिला घेऊन गेल्याचे नंतर त्यांना समजले. मुलीला कर्नाटकात नेऊन तिचं बळजबरीने धर्मांतर करून त्या मुलानं तिच्याशी निकाह केला. होमगार्ड असलेल्या मुलीच्या वडिलांनी या प्रकरणाबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनीही त्याची दखल घेऊन मुलीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, मुलीच्या वडिलांना पाकिस्तानातील एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. तुम्ही तुमच्या मुलीला विसरून जा आणि पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घ्या अशी धमकी देण्यात आली. सायबर पथकाला हा मोबाईल क्रमांक देण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.पीडित होमगार्ड जवानानं दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीचे 13 जुलै रोजी अपहरण करण्यात आले आहे. अर्शद नावाच्या युवकाने तिला कर्नाटकात नेऊन तिचे धर्मपरिवर्तन केले. अर्शदही भोजीपुरा येथीलच रहिवासी आहे. त्याने तिच्याशी लग्न देखील केले. मात्र ते दोघं आता कुठे आहे, या बाबत माहिती नाही.
दरम्यान, पाकिस्तानातील एका क्रमांकावरून होमगार्डच्या फोनवर सोमवारी (ता. 5) व्हॉट्स अॅप कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो पोलीस असल्याचे सांगितलं. त्याचा फोटोही पोलिसांच्या वर्दीतला होता. फोन करणाऱ्याने होमगार्डला त्यांचा पत्ता विचारला. पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घ्या नाहीतर त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. तसंच तुमच्या मुलीला विसरून जा, असेही तो म्हणाला. मुलीबद्दल काही विचारण्याच्या आतच त्याने फोन कट केला. होमगार्डने धमकीच्या कॉलबद्दल पोलिसांना माहिती दिली आहे. सायबर पोलीस त्या पाकिस्तानमधील फोन नंबरबाबत तपास करत आहेत. त्याचप्रमाणे होमगार्डची मुलगी व तिचे अपहरण करणाऱ्या अर्शदचाही शोध घेतला जात आहे.
यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…
धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…
सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…
पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…
भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…
प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…