जालना जिल्ह्याचे शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक; पदभार स्वीकारला…

जालना: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत.

आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी यापूर्वी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आणि शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शैलेश बलकवडे यांनीही तातडीने पदभार स्वीकारला आहे.

जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठी मार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान या सर्व प्रकरणाची आता गृह विभागाने गंभीर दखल घेतली असून, जालना पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात सोमवारपासून जमावबंदीचे आदेश लागू…

जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…

जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!