हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे.
अंशुमन यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी रायबरेलीत खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. जवान शहीद झाल्यानंतर मिळणारे फायदे हे नेक्स्ट टू कीन असलेल्या व्यक्तीला दिले जातात. त्यामुळे आई-वडिलांना काहीच मिळत नाही. या नियमात बदल करावा अशी मागणी त्यांनी केली. हुतात्मा अंशुमन यांचे वडील रवी प्रताप सिंह जेसीओ पदावरून लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते म्हणाले की, सून स्मृती येथून सगळं काही घेऊन गेली. तिने तिचा पत्ताही बदलला आहे. आमच्याकडे कीर्ति चक्र स्वीकारल्याचं काहीच नाही. तेसुद्धा सून घेऊन गेली.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
आई मंजू सिंह यांनी म्हटले की, ‘सुना पळून जातात. आई -वडिलांचाही सन्मान करायला हवा. आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे विनंती केली आहे की लष्करात हुतात्मा होणाऱ्या जवानांच्या कुटुंबातील सुनेशिवाय आई वडिलांचीही काळजी घ्यायला हवी.’ माझा मुलगा लग्नाच्या तीन महिन्यानंतर शहीद झाला. त्याच्या काही दिवसांनीच सून घर सोडून गेली. जेव्हा पुरस्कार दिला गेला तेव्हा स्मृतीसोबत अंशुमनच्या आईला सुद्धा बोलावले. पण पुरस्कार फक्त स्मृतीला दिला. सून वेगळी राहते त्यामुळे आम्हाला काहीच मिळाले नाही. माझ्या मुलाच्या फोटोशिवाय काहीच नाही, असे वडील रवी प्रताप यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अंशुमन यांच्या आई-वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपावर सून स्मृती सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘मला अद्याप काही माहिती नाही. ज्याचा जसा विचार आहे तसंच ते बोलतील. मला काही आक्षेप नाही. आता मी बाहेर आहे. ते काय बोलले आहेत ते पाहून मी बोलेन.’
हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…
जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…