महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…

कल्याण: हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गणपत गायकवाड यांना पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली आहे.

कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहेत. एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. शुक्रवारी गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये वाद सुरु असताना गणपत गायकवाड यांनी येऊन पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात खुप जूना वाद आहे. दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दोघेही राज्यात आणि केडीएमसीमध्ये सत्तेत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा राडा पक्षश्रेष्ठी गंभीरतेने घेणार का? वाद मिटणार का? याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!