चिखली परिसरात घरफोडया करणारी टोळी जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): चिखली परिसरात घरफोडया करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोरेवस्ती, रुपीनगर, चिखली या परिसरामध्ये मोठया प्रमाणात कामगार वर्ग राहण्यास आहेत. सध्याचा ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड पाहता लोक मोठया प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करीत असतात. लोकांनी खरेदी केलेल्या वस्तुंचे पार्सल कुरियर कंपनीमार्फत ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात. अशाच एका शाडो फॅक्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कुरियर कंपनीचे ऑफीस आंगणवाडी रोड, मोरेवस्ती चिखली पुणे या ठिकाणी आहे. ०१/०७/२०२४ रोजी रात्रौ १२.३० वाजता ते ०५.३० या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी शाडो फॅक्स टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कुरियर कंपनीचे शटर कशाचेतरी सहाय्याने उचकटुन त्यावाटे आत प्रवेश करुन कंपनीतील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडुन त्यामध्ये ठेवलेले गोदरेज कंपनीचे डिजीटल लॉकर त्यामध्ये ठेवलेल्या १,०७,२४४/- रोख रक्कमेसह घरफोडी चोरी करुन घेवुन गेले होते.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

सदर कंपनीचे ऑफीसमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असुन आपण पकडले जावु याची जाणीव झाल्याने आरोपींनी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज असलेले डी. व्ही. आर. मशीनदेखील चोरुन नेले. सदरबाबत फिर्यादी मन्नु रामबचन यादव (वय २९ वर्षे, राह.आंगणवाडी रोड मोरेवस्ती, चिखली, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारी वरुन चिखली पोलिस स्टेशन गु. रजि. नंबर ३६८/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण मोगले यांचेकडे देण्यात आला.

सदर गुन्हयातील आरोपींना ओळखण्याचा महत्वाचा पुरावा म्हणजे सीसीटीव्ही कॅमे-यांचे डीव्हीआर मशीन चोरुन नेले असल्याने आरोपींची ओळख पटवुन त्यांना अटक करणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. सदर गुन्हयाचा तपास चालू असतानाच दिनांक ०५/०७/२०२४ रोजी रात्री २३.४५ ते दिनांक ०६/०७/२०२४ रोजी सकाळी ०६.४५ वाजताचे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी डिलेवरी लिमीटेड कंपनी, टॉवरलाईन, सहयोगनगर, तळवडे या कुरियर कंपनीचे ऑफीसचे शटर उचकटुन लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडुन कपाटातील १,०३,३८४/- रुपये रोख रक्कम व ऑफीसमधील १५,८५८/- रुपयांचे कुरियरचे पार्सल घरफोडी चोरी करुन चोरुन नेले सदरबाबत फिर्यादी सचिन पांडुरंग जढर (वय २५ वर्षे, राह.विठ्ठलवाडी, देहुगाव, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चिखली पोलिस स्टेशन गु. रजि. नंबर ३८५/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ ( ९ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक गणेश खारगे यांचेकडे देण्यात आला.

policekaka-special-offerपोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

वरील दोन्ही गुन्हयातील आरोपींची गुन्हा करण्याची मोडस पाहीली असता दोन्ही गुन्हे एकाच आरोपींनी केले असण्याची शक्यता असल्याने चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाचे प्रभारी राजेश मासाळ, पोलिस उपनिरीक्षक व अंमलदार यांचे एक पथक स्थापन करुन त्यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक राजेश मासाळ व पथकाने कौशल्यपुर्वक तपास करुन घटनास्थळाचे परीसरातील सर्व बाजुने येणा-या जाणा-या रस्तावरील सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेजची तपासणी करुन आरोपींचा माग काढण्यात सदरची टीम यशस्वी झाली. त्यांनी सदर गुन्हयामध्ये आरोपी
१) आदर्श दयानंद मोरे वय २५ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव पुणे,
२) आनंद पोपट गादेकर वय ३४ वर्षे, राह. अवधुत सोसायटी, पिंगळे चौक, चिखली, पुणे
३) प्रदिप दिलीप तांबोळी वय २५ वर्षे रा.भाटेवस्ती, तळवडे गाव, पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वरीलप्रमाणे दोन्ही गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन
१) चिखली पोलिस स्टेशन गु. रजि. नंबर ३६८ / २०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ (ए) या गुन्हयातील ५५,०००/- रुपये रोख रक्कम
२) चिखली पोलिस स्टेशन गु. रजि. नंबर ३८५/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (ए) या गुन्हयातील ६४,००० /- रुपये रोख रक्कम
३) गुन्हा करण्यासाठी वापरलेली ३,००,०००/- रुपये किंमतीची वॅगनर कार नंबर एम. एच. १४. के. ए. ८५३७, ४) गुन्हा करण्यासाठी वापरलेली २०,०००/- रुपये किंमीची पल्सर मोटारसायकल नंबर एम. एच. १४. सी. टी.०१३४ असा एकुण ४,३९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी शिवाजी पवार, पोलिस उपआयुक्त परिमंडळ – ३, पिंपरी चिंचवड, संदीप हिरे, सहा.पोलिस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विठ्ठल साळुंखे वरीष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली पोउनिरी/ राजेश मासाळ, पोहवा / संदिप मासाळ, पोहवा/सुनिल शिंदे, पोहवा / अमोल साकोरे, पोहवा/चेतन सावंत, पोहवा / बाबा गर्जे, पोहवा / दिपक मोहिते, पोना / सुरज सुतार, पोना / कबीर पिंजारी, पोना/संदीप राठोड, पोशि/गौतम सातपुते पोशि/ संतोष भोर, पोशि/ संतोष सकपाळ यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

चिखली पोलिसांनी अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून केली सुटका…

चिखली पोलिसांनी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…

चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!