लोणीत घरफोडी केलेल्या गुन्हेगारास सातारा पोलिसांनी केली अटक…

मंचर, पुणे ( कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील पैसा वस्तीवरील विवेक सुभाष वाळुंज यांच्या राहत्या घरी गेल्या वर्षी झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास सातारा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोणी येथे २३/८/२०२३ रोजी झालेल्या घरफोडी मध्ये आठ लाख १६ हजार रुपयांचे मौल्यवान दागिने चोरून नेले होते. राज्यात ७७ गुन्हे नावावर असलेल्या आरोपी सूरदेव सिलोन नानावत (वय ३३, राहणार घोटावडे ता. मुळशी जि. पुणे) याचा व त्याचे साथीदार यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या वर्षभर सदर गुन्ह्याचा तपास चालू होता. सदर आरोपीस सातारा पोलिसांनी पकडले असून सध्या आरोपी सातारा जिल्हा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता. सदरहू माहिती पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन यांना प्राप्त झाल्यामुळे घोडेगाव न्यायालय यांच्याकडे अर्ज करून सदर आरोपीचा ताबा घेण्याचा आदेश न्यायालयाकडून प्राप्त करण्यात आला.

सदरचा आदेश घेऊन पारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस नाईक अविनाश कालेकर व इतर पथक यांनी साताऱ्यात जाऊन आरोपीचा ताबा घेतला व त्याला पारगाव कारखाना पोलिस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आली. सदर आरोपीस घोडेगाव न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, नितेश घट्टे अप्पर पोलिस अधीक्षक, सुदर्शन पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी खेड विभाग, अविनाश सिलिमकर स्थानिक गुन्हे पुणे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे, भाऊसाहेब लोकरे पोलिस उपनिरीक्षक, अविनाश कालेकर पोलिस नाईक व त्यांचे सर्व सहकारी यांनी केली.

थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…

संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेले चौघे पकडले; जाणार होते…

औरंगजेबाचे स्टोरी स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

वळसे पाटील व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधात आंदोलन करतो काय? म्हणून मारहाण…

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!