दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…

पाटणा (बिहार) : कौटुंबिक वादातून दोन पत्नींनी मिळून नवऱ्याची हत्या केल्याची घटना सारण जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही पत्नींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. आलमगीर अन्सारी (वय 45, रा. बेदवलिया) हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.

आलमगीर अन्सारी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पहिली पत्नी सलमा खातून आणि दुसरी पत्नी अमीना खातून या दोघींनाही ताब्यात घेतले आहे. आलमगीरचा भाऊ वसीम अन्सारी याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आलमगीरच्या पहिल्या पत्नीला दोन मुलं आहेत. तो दोन्ही पत्नी आणि मुलांसह एकाच घरात राहत होता. दोन्ही पत्नींसोबत आलमगीरचे जोरदार भांडण झाले होते. दोघींनी घरातला खंजीर घेऊन आलमगीरच्या छातीत भोसकला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. पण, दोघींनी त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले, मात्र त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक होती त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पीएमसीएच रुगालयात नेण्यास सांगितले. पीएमसीएचच्या वाटेवरच आलमगीरचा मृत्यू झाला.’

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्व गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनतर आलमगीरचा मृतदेह सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कडाक्याचं भांडण झाल्यानंतर एका पत्नीने आलमगीरला घट्ट पकडून ठेवले आणि दुसऱ्या पत्नीने त्याच्या छातीत खंजिराने सपासप वार केले. दोन्ही बायकांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासातून दोन लग्नांवरून वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे.’

पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; मुलगा झाला पोरका…

धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…

पत्नीची हत्या केली अन् नवऱ्याला आला हृदयविकाराचा झटका…

धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…

प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!