दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाट ठरला कारणीभूत…

सांगली : सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद, ता. तासगाव) आणि प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी, ता. वाळवा) अशी मृत युवकांची नावे आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला.

सांगली जिल्ह्यात डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या मुरवणूकीत हा प्रकार घडला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने दुधारीतील आणि कवठेएकंद येथे दोघांचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे.

प्रवीण शिरतोडे परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने मिरवणुकीत सहभागी झाला होता. बंद पडलेली दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसोबत त्याला नाचत असतानाच चक्कर आल्याने तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शेखर या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांपूर्वीच त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. सोमवारी रात्री शेखर एका गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता. त्यावेळी विविध मंडळांसमोर जोरजोराने गाणी वाजत होती. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात भोवळ येऊन पडला. तासगावला खासगी रुग्णालयात नेले; पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ऐन उमेदीत दोन युवकांचा नाहक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…

गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

Video: कपिल देव यांचे तोंड आणि हात बांधून घेऊन जात आहेत…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!