प्रियकरासह त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीचे न्यूड फोटो केले व्हायरल…
छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन विद्यार्थिनीचे न्यूड फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना येथे आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन युवकांनी तिचे न्यूड फोटो व्हायरल केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
अनिकेत राठोड, उमेद पाशा आणि कुणाल बावत अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणारी 17 वर्ष वयाची अल्पवयीन पीडिता महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहाते. घरी अभ्यास होत नसल्याने ती एप्रिल 2023 मध्ये या वसतिगृहात राहायला आली होती. तिथे आल्यावर तिच्या अनेकांशी ओळखी झाल्या होत्या.
आरोपी अनिकेत राठोड, उमेद पाशा आणि अनिकेतचा मित्र कुणाल यांच्यासोबतही तिची ओळख झाली. पुढे अनिकेत याच्यासोबत असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनिकेतने याच गोष्टीचा फायदा घेतला आणि पीडितेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. अनिकेतने तिला म्हटले, ‘तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुझे न्यूड फोटो पाठव.’ असे म्हणत अनिकेतने तिला आपल्या बोलण्यात अडकवले.
पीडित युवतीने प्रियकरावर विश्वास ठेवून आपले न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर त्याला पाठवले. मात्र, या तीन आरोपींनी मिळून हे फोटो व्हायरल केले. पोलिसांनी सध्या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…
रोमिओची धुलाई; अब तू मर और बोल आय लव यू…
प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…
प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…
प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…