Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
रायगड : एका भरधाव ट्रकने चार जणांना उडवले असून, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अपघाताची घटना उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेल समोरील सर्विस रोडवर घडली आहे. एका ट्रकने चार जणांना उडवले आहे. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहेत की, चार व्यक्ती सर्विस रोडवरून चालत जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना उडवले. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
उरणमध्ये ट्रकने चार जणांना चिरडले…https://t.co/42LUDp6Iqz pic.twitter.com/dVKuWnXjtm
— policekaka News (@policekaka) August 26, 2023
नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…
सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…
Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…
Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…