छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात डीजे शिवाय निघाल्या मिरवणूका; पोलिसांची शिस्त…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहराच्या इतिहासात प्रथमच, डी.जे. व लेसरशिवाय सर्व गणपती विसर्जन व मिरवणुका शांततामय, वेळेवर व सुरळीत पार पडल्या. डीजेमुक्तीचे काटेकोर पालन करीत पारंपरिक वाद्ये वादनातून गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.

दोन महिन्या पूर्वी, आपल्या निर्देशानुसार व सूचनेनुसार धार्मिक स्थळांवरील ६,५९१ अवैध लाउडस्पीकर काढून टाकल्यामुळे जनतेस मोठा दिलासा मिळाला. यामुळे सर्व बँड, देसी ढोल, लेझीम व पारंपरिक कार्यक्रमांची मागणी वाढली आणि लोक कुटुंबांसह व लहान मुलांसह मिरवणुका पाहायला मोठ्या संख्येने आले. शहरात ८०३ सार्वजनिक आणि सुमारे १,६१,००० घरगुती गणपती विसर्जित झाले. संपूर्ण गणेश उत्सव व विसर्जन दिवशी जनतेचा व माध्यमांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक राहिला, आणि सरकार व पोलिस यांच्याबद्दल सकारात्मक छाप निर्माण झाली. ही लक्षणीय कामगिरी आमच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या निष्ठा, शिस्त आणि मेहनतीमुळे शक्य झाली.

गणेशोत्सव मिरवणुकीसाठी शहरात आणण्यात आलेले DJ वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी यांना पाचरण करून DJ चालक व मालकावर खालील प्रमाणे कार्यवाही करून दंड आकारण्यात आला.

दि. 25/08/2025 रोजी पोस्टे सातारा
1.MH-11-AL-0186 दंड 35000/-

दि. 06/09/2025 रोजी पोस्टे MIDC वाळूज
2.MH-19-CX-O473 – दंड 29000/-
3.MH-09- BC-1671- दंड 33000/-
4.MH-43-Y-5891 – दंड 54000/-
5.MH-19-CX-6999 दंड 49000/-

दि. 07/09/2025 रोजी पोस्टे छावणी
6.MH-20-AT-5476 दंड 49000/-

अशाप्रकारे DJ वाहन चालक व मालकांवर एकूण 2,49,000/- रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

अजित पवार यांना नडणाऱ्या IPS अंजली कृष्णा आहेत कोण…

राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी; PSI होण्याचा मार्ग मोकळा…

कुख्यात डॉन अरुण गवळी याला अखेर जामीन मंजूर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!