नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…

काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील बारा जिल्ह्यात बसला झालेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या सात पैकी सहा जण हे भारतीय भाविक असल्याची माहिती समोर आली आहे.  अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांनी ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

नेपाळमध्ये बुधवारीसुद्धा भीषण अपघात झाला होता. बागमती भागात बस नदीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. बस काठमांडूहून पोखराच्या दिशेने जाताना त्रिशुली नदीत कोसळली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे समजू शकलेली नाहीत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…

हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…

Video: शिमलातील शिव मंदिर कोसळून नऊ जणांचा मृ्त्यू तर अनेकजण…

बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!