संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…

उरण (नवी मुंबई): आईच्या कुशीत झोपलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला नराधम बापाने हिसकावून घेत जमिनीवर जोरात आपटून मारल्याची संतापजनक घटना उरणमधील बोकडविरा येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

अमुता खुशीराम ठाकूर ही पती खुशीराम गजानन ठाकूर याच्या सोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत राहत आहे. दोघांना पाच महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती. तिचे नाव रुही असे ठेवण्यात आले होते. अमुता आणि खुशीराम यांच्यात रविवारी दुपारी काही कारणावरून भांडण झाले. तेव्हा अमुता तिच्या पाच महिन्यांच्या रुहीला घेऊन शेजारी नातेवाईकांकडे गेली.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पत्नी आपल्या चिमुकल्या मुलीसोबत नातेवाईकांकडे गेल्यानंतर संतापलेल्या खुशीराम ठाकूर याने नातेवाईकाचे घर गाठले. तिथे त्याने माझी मुलगी दे असे म्हणत पत्नी अमुता हिच्याशी वाद घातला. आपल्या चिमुकलीला देण्यास आईने विरोध केला. तेव्हा खुशीरामने रुहीला हिसकावून घेतले आणि जोरात जमिनीवर आपटले. पाच महिन्यांच्या रुहीला जमिनीवर आपटल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच ती मृत्यूमुखी पडली.

नराधम बापाने चिमुकलीचा बळी घेतल्याने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती उरण पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी खुशीराम गजानन ठाकूर याला अटक करण्यात आली आहे.

संतापजनक! बालकाच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने मृत्यू…

संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट…

संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…

विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…

संतापजनक! भावकीतील महिलेने सूडाच्या भावनेतून घेतला चिमुकल्यांचा जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!