सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता…

पुणे (संदीप कद्रे): सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, गु.र.नं. २८२/२०१७ नुसार पीडित मुलगी (वय १४) ही तिच्या आई वडीलांसोबत १९/७/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता विश्रांतवाडी मजुर अड्डयावर कामाच्या शोधात थांबली होती. आरोपी अशोक रज्जत श्रीपाल याने पीडीतेला कळस येथे कामासाठी घेवून जातो असे तिच्या वडीलांना सांगितले होते. पीडीतेस घेवून गेला तेव्हा पीडीतेचे आई वडील हे इतर ठिकाणाहून काम करून संध्याकाळी ६ वाजता परतले होते. पीडित मुलगी कामावरून आली नसल्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. मात्र, मुलगी न सापडल्याने तिच्या वडीलांनी अशोक श्रीपाल यांचे विरोधात विश्रांतवाडी पोलिसात भा.दं. वि. कलम ३६३ नुसार अपहरणाची तक्रार दिली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी पीडित मुलीने तिच्या वडीलाना फोन करून मुकेश नथु श्रीपाल याने तिला दौंड रेल्वे स्टेशनवर सोडल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पीडित मुलीच्या वडीलांनी नातेवाईकांसह दौंड रेल्वे स्टेशनवरून मुलीला ताब्यात घेतले व पीडितेच्या जबाबावरून अशोक श्रीपाल व मुकेश श्रीपाल यांच्या विरोधात भा.दं. वि. कलम ३६३, ३६६, ३७६ (ड) व पॉक्सो अॅक्ट चे कलम ३, ४, ७, ८ व १२ अन्वये सामुहिक बलात्काराचे कलम वाढ करण्यात आले. तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले.

सदर कामी सरकार तर्फे दोन्ही आरोपींच्या दोष सिध्दीसाठी एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्ष तर्फे अॅड. जी. एन. ऐवळे यांनी प्रखरपणे बाजू मांडुन प्रभावी उलट तपास केला व रेकॉर्ड वरील पुराव्यानुसार पीडितेचे वय ‘बालक’ या व्याख्येत येत नसल्याचे सिध्द केले. त्याचबरोबर आरोपींनी संगनमताने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप सिध्द होत नसल्याचा प्रबळ युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश पत्रावळे, पुणे यांनी आरोपींच्या वतीने अॅड. जी. एन. ऐवळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपी मुकेश नथु श्रीपाल व अशोक रज्जत श्रीपाल यांची सदर केस मधून नुकतीच निर्दोष मुक्तता केली. सदर केसकामी अॅड. जी. एन. ऐवळे यांना अॅड. सुरेश भोकरे, अॅड. विशाल पोकळे, अॅड. संतोष लोकरे, अॅड. आलाप ऐवळे यांनी मदत केली.

लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाचा आरोपीला दणका…

इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!