
पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी; पाहा रचना…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वित्त आणि गृह विभागाला पाच नवीन पोलिस ठाणी, अतिरिक्त मनुष्यबळ, दोन नवीन परिमंडळाच्या निर्मितीस मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देताना वित्त विभागाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
पुणे पोलिस दलात आता सात परिमंडळे (झोन) होणार आहेत. विमानतळ पोलिस ठाण्यातून लोहगाव, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातून नऱ्हे, येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर, कोंढवा पोलिस ठाण्यातून येवलेवाडी, हडपसर पोलिस ठाण्यातून मांजरी पोलिस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे पुण्यातील पोलिस ठाण्यांची संख्या ४४ होणार आहे.

नव्याने निर्माण होणाऱ्या परिमंडळ सहा आणि सातसाठी दोन कोटी ३६ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पोलिस ठाण्याचे कामकाज येत्या नवीन वर्षात सुरू करण्यात येणार आहे. परिमंडळ निर्मितीसाठी सहायक आयुक्त विवेक पवार यानी शासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता.
पुणे पोलिस दलातील पोलिस ठाणेनिहाय परिमंडळाची रचना
परिमंडळ एक : खडक, फरासखाना, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन
परिमंडळ दोन : स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, भारती विद्यापीठ, आंबेगाव
परिमंडळ तीन : कोथरूड, वारजे माळवाडी, अलंकार, उत्तमनगर, नांदेड सिटी, सिंहगड रस्ता, नऱ्हे
परिमंडळ चार : बाणेर, चतु:शृंगी, खडकी, विश्रांतवाडी, येरवडा, लक्ष्मीनगर
परिमंडळ पाच : येवलेवाडी, कोंढवा, वानवडी, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, लष्कर
परिमंडळ सहा : मुंढवा, हडपसर, काळेपडळ, फुरसुंगी, मांजरी, लोणी काळभोर
परिमंडळ सात : लोणीकंद, वाघोली, लोहगाव, विमानतळ, खराडी, चंदननगर
पुणे शहरात यापूर्वी सात पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात आली होती. शहराचा विस्तार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आणखी पाच नवीन पोलिस ठाणी, दोन परिमंडळे, अतिरिक्त मनुष्यबळांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने पुणे पोलिसांचा प्रस्ताव मंजूर केला असून, लवकरच नवीन पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…
पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…
पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…
पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

