
हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…
बीड : एका रिलस्टारचा उसाच्या ट्रॉलीखाली दबून करूण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना बीडमध्ये घडली आहे. अपघातावेळी त्याची ऊसतोड मजूर पत्नी फेसबुकवर लाईव्ह करत होती. आपल्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू पाहून ती किंचाळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथे ही घटना घडली आहे. गणेश डोंगरे असे मृत्युमुखी पडलेल्या रिलस्टारचे नाव आहे. गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे रिलच्या माध्यमातून ऊसतोड मजुराचं कसं आयुष्य असतं हे दाखवत होते. अश्विनी आणि गणेश डोंगरे हे वेगवेगळ्या रिल्स च्या माध्यमातून सोशल मीडियावर देखील लोकप्रिय होते. गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी हे लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ऊस सोडण्यासाठी गेले होते. साखर कारखान्यात वजन काट्याजवळ ऊस मोजण्यासाठी बरीच गर्दी होती. त्यामुळे आपला नंबर येण्यासाठी गणेश डोंगरे आणि त्याचे साथीदार वाट पाहत होते. यावेळी अश्विनी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ लाईव्ह केला. गणेश बसला होता, तिथे उसाची ट्रॉली उलटली आणि अश्विनी तसं बायो म्हणत किंचाळली अन् धावत गेली. संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्सन हळहळ व्यक्त करत आहेत.
बीड! फेसबुक लाईव्हदरम्यान रीलस्टारच्या अंगावरुन गेली ट्रॅक्टरची ट्रॉली…
पत्नीच्या डोळ्यादेखतच गणेश डोंगरे यांचा अंगावर ट्रॅक्टर ट्रॉली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे डोंगरे कुटुंब उघड्यावर आलं आहे. गणेश डोंगरे यांना तीन लहान मुली आहेत. या कुटुंबाला कारखान्याने मदत करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान रिलस्टारचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्याच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. लवकर या…
हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! शिक्षकांचा संप अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जागेवर जीव…
हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…


