पोलिसाचा खून करणारा निघाला कुटुंबातीलच व्यक्ती; असं फुटलं भिंग…

सोलापूर: देवगाव रंगारी येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह घराशेजारील शेडमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी काही तासांतच तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला जेरबंद केले.

नानासाहेब रामजी दिवेकर असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. लहान भावानेच त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मृत नानासाहेब आणि संशयित आरोपी लहानू रामजी दिवेकर यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादाचा राग मनात धरून लहानू याने 2 जानेवारीच्या रात्री नानासाहेब घरात गाढ झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्यांचा त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

खुनाचा कोणताही पुरावा मागे उरू नये या उद्देशाने, लहानूने घराच्या जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून मृतदेह तिथे गाडून टाकला. सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब यांच्या पथकाने सखोल चौकशी केली असता, लहानूने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांना तपासादरम्यान काही ठिकाणी माती उकरलेली दिसली अन् संशय निर्माण झाला होता. पोलिसांनी गुन्हा उघड करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नानासाहेब दिवेकर हे पोलिस दलात येण्यापूर्वी भारतीय लष्करात देशसेवा बजावत होते. लष्करातून निवृत्त झाल्यावर 7 वर्षांपूर्वी ते महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले होते आणि संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत होते.

धक्कादायक! माती उकरली अन् बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह…

सांगली! पोलिसांनी रेल्वे तिकिटावरून अन् चिक्कीवरून लावला नीतूच्या खुनाचा छडा…

महाराष्ट्राचे भाग्य! महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी डॉ. सदानंद दाते…

मुंबई! पोलिसकाकाला वर्षाचा शेवटचा दिवस ठरला जीवघेणा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!