
दिशा सालियान हिने वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून केली आत्महत्या…
मुंबईः दिशा सालियान हिच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियान ही वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा चर्चा केली होती. याच आर्थिक तणावातून दिशा हिने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती. याबाबत दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य सबंधांबद्दल मित्रांनाही सांगितले होते. या गोष्टींमुळेच तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे.
दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे या अवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होते, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दिशा सालियान प्रकरण! आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता…
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांची होणार चौकशी…
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात…
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…
भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल…

