राज्यात पुन्हा साडेसात हजार पदांसाठी पोलिस भरती; मुंबईत बाराशे पदं…

मुंबईः राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलिस भरती केली जाणार असून, पोलिस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापैकी तब्बल बाराशे पदं ही मुंबई पोलिस दलासाठी भरली जाणार आहेत.

राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास 35 हजार पदांवर पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यात 2022 आणि 2023 मध्ये मोठ्या पोलिस भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलिस भरती होणार आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुमारे तीन वर्ष राज्य पोलिस दलात भरती झाली नाही. पण, वाढत्या लोकसंख्येपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 18 हजार आणि 17 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलिस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.

policekaka-special-offerपोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

काही दिवसांपूर्वी राज्यात पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी लवकरात लवकर सध्याची 14 हजार 471 पदांची पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यांत पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक, शिपाई आणि पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदान न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने घेण्यात आली होती. सध्याची पोलिस भरती प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात नवी पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पोलिस भरती प्रक्रियेत मुंबई पोलिस दलासाठी बाराशे पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबईत गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलिस त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलिस दलात दाखल होणार आहेत. मुंबईत 4230 पोलिस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार 572 पोलिस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

राज्यात महिला पोलिस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबईला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलिस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत.

पोलिस भरती! मराठा उमेदवारांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती; पाहा कारण…

पोलिस भरती! सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग…

पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी…

पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!