भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…

बीडः बीड-परळी मार्गावर आज (रविवार) पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या युवकांना भरधाव एसटी बसने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही युवक पोलिस भरतीची तयारी करत होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके अशी मृत युवकांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड परळी महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एसटी बसने पाच युवकांना उडवले. या अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस भरतीसाठी तयारी करणारे युवक हे नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने जोरात धडक दिली. घोडका राजुरी जवळ झालेल्याया या अपघातात 3 तरुणांचा चिरडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तरुणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती कळताच युवकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. परळी महामार्गावर झालेल्या अपघातात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरली असून बसचा मागच्या काचा फुटल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…

महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या IT मधील युवतीचा अपघाती मृत्यू…

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!