जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…

जळगाव: जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ आज (बुधवार) साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली होती. जळगाव रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर परधाडे रेल्वे स्टेशनच्या अगोदर रेल्वेने ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झाले. काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते. त्यांनी हे घर्षण पाहिले. त्यांना वाटले पुष्पक एक्स्प्रेसला आग लागली. प्रवाशांनी आग लागल्याची अफवा पसरवली. त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या. यावेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. याच रेल्वेखाली चिरडली गेले. मृत प्रवाशांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे, कुठं शीर तर कुठे मृतदेह आढळून आले आहेत.

एकाच डब्यातील प्रवाशांनी उड्या मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे प्रशासना आता घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी रुग्णावाहिका पोहोचल्या असून जिल्हा वैद्यकीय अधिकारी व रेल्वेचे अधिकारीही मदतीसाठी प्रयत्नशील आहेत. येथील तीन रुग्णालयांना आपण सक्रीय राहण्याचे सांगितले असून ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यात येत आहे. प्रांताधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 ते 8 जण रेल्वेखाली आल्याची माहिती आहे.

जळगावच्या माहेजीजवळ असताना पुष्पक एक्सप्रेस असताना आग लागल्याची अफवा पसरली. कोणीतरी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबताच डाऊनच्या रेल्वे रुळावर प्रवासी उतरून उभे होते. तेवढ्यात भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बंगळूरु एक्सप्रेसखाली आल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…

मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…

हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…

Video: आंध्र प्रदेश रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला…

Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!