नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

नाशिक: नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (वय 18), इब्राईम शेख (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी (ता. १०) रात्री 8 च्या सुमारास संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मेराज खान याचा मृत्यू झाला. इब्राईम शेखवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय असून पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर रात्री दाखल झाले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजीव नगर येथील खंडेराव मंदिर शिवनेरी चौकात इब्राहिम खान व मेराज खान यांचे एकाशी किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यानंतर समोरील अल्पवयीन मुलाने त्याचे मित्र बोलवून इब्राहिम व मेराज यांच्यावर हल्ला केला. त्यात दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला केल्याने मिराज खान याचा जागीच मृत्यू झाला तर इब्राहीम खान याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र त्याचाही उपचारावेळी मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी काही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!