
दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून केला तिघांचा खून; पण…
हिंगोली : डिग्रस वाणी गावातील आई वडील आणि भावाचा खून करून गावालगत असलेल्या रस्त्या जवळील वळणांमध्ये मृतदेह ठेवत अपघात केल्याचा बनाव केला. परंतु आरोपीचे हे बिंग फोडत हिंगोली पोलिसांनी या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोटच्या मुलानेच आई-वडील आणि भावाचा खून करुन दुचाकी अपघाताचा बनाव रचला होता. दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून खुनाचा कट रचल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.
डिग्रस वाणीच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातात आई-वडील आणि मुलाचा मृत्यू काही दिवसापूर्वी झाला होता. कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे होती. पण, हा अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महेंद्र जाधव याने आई-वडिल आणि भावाची हत्या करुन अपघाताचा बनाव रचला. आई वडिल आणि भाऊ पैसे देत नसल्याच्या रागातून महेंद्र याने हे संतापजनक कृत्य केले. महेंद्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना महेंद्रवर संशय आला आणि पोलिसांनी महेंद्र जाधवला चौकशी साठी ताब्यात घेतले. आरोपीला विश्वासात घेत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी महेंद्र जाधवला त्याच्या आई वडील कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव हे पैसे देत नव्हते. भाऊ आकाश जाधव सुद्धा नातेवाईकांमध्ये त्याचा अपमान करत असे त्यामुळे स्वतःच्याच आई-वडील आणि भावाला मारून टाकण्याचा कट त्याने दिवाळीपासून रचला होता. त्यासाठी महेंद्र जाधव ने दृश्यम हा चित्रपट तब्बल पाच वेळा पाहून आणि क्राइम पेट्रोलचे अनेक भाग पाहून खून करण्याचे ठरवले.
महेंद्र जाधव याने 9 जानेवारी रोजी रात्री भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याला विजेचा शॉक दिला तरीही मात्र आकाश जाधव जिवंत आहे हे कळल्यानंतर त्याने त्याच्या डोक्यात रोड घालून खून केला. त्यानंतर मृतदेह रोडलगत असलेल्या नाल्यामध्ये टाकला. 10 जानेवारीला दुपारी त्याची आई कलावती जाधवला सुद्धा झोपेच्या गोळ्या देत शेतामध्ये नेत डोक्यामध्ये रॉडने वार करत तिचा सुद्धा खून केला. मृतदेह रोडलगत त्याच ठिकाणी नेऊन टाकला. त्यानंतर मध्यरात्री वडील कुंडलिक जाधव यांना सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या आणि डोक्यामध्ये रोडचा वार करत खून केला. मृतदेह परत त्याच ठिकाणी रोडच्या लगत असलेल्या नाल्यात आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ ठेवून दिला आणि त्या ठिकाणी अपघात केल्याचा बनाव केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला असून, पुढील तपास करत आहेत.
कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…
शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…
येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून; कसा केला पाहा…

