नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश) : मैहर येथे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरला शनिवारी (ता. २८) रात्री उशिरा धडकली. यावेळी झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही नागपूरवरून निघाली होती.

राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा अपघात झाला. बस प्रयागराजहून रीवा मार्गे नागपूरला जात होती. बस भरधाव वेगात असल्यामुळे अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ५३ सीटर बसमध्ये ४५ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात इतका भीषण होता की बसचा चक्काचूर झाला. अपघातातील मृत आणि जखमी बसमध्येच अडकले होते. जेसीबी आणि गॅस कटरच्या मदतीने बसचा पत्रा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. काही प्रवाशांनी खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. रात्री दोन वाजता बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, बचावकार्यावेळी स्थानिक नागरिक मदतीला धावले. अपघातात जखमींची संख्या जास्त असल्याने घटनास्थळी रुग्णवाहिका कमी पडल्या. सुरुवातीला एकच रुग्णवाहिका दाखल झाली होती. काही जखमींना पोलिसांनी त्यांच्या गाडीने रुग्णालयात पोहोचवले.

पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू…

बीडमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू…

जालना येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 ठार, 14 जखमी

हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…

शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…

Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!