समृद्धी महामार्ग पुढील काही दिवसांसाठी राहणार बंद; कारण…

पुणे: समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असल्यामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते साडेतीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळात बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 10 ते 12 (मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीनही दिवस) तर दुसरा टप्पा 25 व 26 (बुधवार व गुरुवार असे दोनही दिवस) असेल. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक 10 ते 12 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 25 ते 26 ऑक्टोबरला दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात येणार आहे. इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल.’

समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान समृद्धी महामार्गवरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.

समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!