लोणीकंद पोलिसांनी २७ लॅपटॉप केले जप्त; १८ गुन्हे उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिस तपास पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरलेले २७ लॅपटॉप जप्त केले आहेत. सराईत गुन्हेगाराकडून २७ लॅपटॉप ०१ टॅब व ०१ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्हयातील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणून एकूण १०,८०,००० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत आरोपी हा पहाटेचे वेळी उघडे दरवाजावाटे, कॉलेज परीसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विदयार्थीच्या रुममध्ये चार्जिंगला लावलेले किंवा ठेवलेले लॅपटॉप चोरी करुन गुन्हा करीत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे वारंवार घडणा-या गुन्हयांचा पध्दतीचा अभ्यास करुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी तपास पथकातील अधिकारी सपोनि गजानन जाधव व सपोनि रविंद्र गोडसे यांना लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी योग्य त्या सुचना देवुन रायसोनी कॉलेज परिसरात तपास पथकातील पोलिस अंमलदार यांना पेट्रोलिंग करणेबाबत व सापळा लावुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
तपास पथकातील सपोनि गजानन जाधव, सपोनि रविंद्र गोडसे, पोलिस नाईक ७४४७ फरांदे, पोलिस नाईक ७३९७ जगताप, पोलिस शिपाई ६४९७ ढोणे, पोलिस शिपाई १०५९४ माने हे १५/१०/२०२३ रोजी रायसोनी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करुन सापळा लावून थांबले होते. रायसोनी कॉलेज परिसरात लॅपटॉप चोरी करणारा चोरटा हा रायसोनी कॉलेजचे मुख्य गेट समोर उभा असुन त्याने अंगात फुल बाहयांचा निळया रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेली आहे. सदरची बातमी पोलिस नाईक ७४४७ फरांदे यांनी तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव यांना सांगितली असता त्यांनी वरील पोलिस स्टाफचे मदतीने रायसोनी कॉलेज समोरील मुख्य गेट समोर यशस्वी सापळा लावला. मिळालेल्या बातमीप्रमाणे निलेश प्रफुलचंद कर्नावट (वय ३९ वर्ष, रा. मु.पो. नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले.
लॅपटॉप चोरी झालेल्या घटनास्थळ ठिकाणांचे सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी व ताब्यात घेण्यात आलेला आरोपी एकच असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यास विश्वासात घेवुन अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातील रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बॉयसेस कॉलेज, एमआयटी कॉलेज, वारजे माळवाडी, देहु, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातुन लॅपटॉप चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे न्यायालयाकडून पोलिस कस्टडीची रिमांड घेवून आरोपीकडून वेगवेगळया कंपनीचे एकूण २७ लॅपटॉप, १ टॅब व १ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण १०,८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस नाईक अजित फरांदे हे करीत आहोत. आरोपीकडे केलेल्या तपासात खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी शशिकांत बोराटे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, संजय पाटील, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर, मारुती पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव, रविंद्र गोडसे, सपोफौ बाळासाहेब सकाटे, पोलिस हवालदार संदीप तिकोणे, पोलिस नाईक अजित फरांदे, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण, प्रितम वाघ, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.
लोणीकंद पोलिसांची हातभट्टीवर कारवाई; पोलिसांचे आवाहन…
लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…
लोणीकंद पोलिसांनी वेशांतर करून पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास पकडले…
लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…
लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!