
धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…
पुणेः पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांत पीडित नगरसेविका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपू्र्ण संबंध होते. या मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करण्याची आरोपीने पीडित महिलेला धमकी दिली. शिवाय, मैत्रीपूर्ण संबंधाची पतीला माहिती देण्याची धमकी देत आरोपीने माजी नगरसेविका महिलेवर वारंवार बलात्कार केला. २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून आरोपीने अत्याचार केले होते. नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये उकळले असल्याची तपासात समोर आली आहे.
आरोपी सचिन काकडे हा दोन दिवसांपूर्वी तिच्या घरी आला. ‘तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे,’ असे सांगून त्याने तिला मारहाण केल्याचे ही पोलिसांत तक्रार दाखल केलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे. पीडित महिलेने आरोपी सचिन काकडे याच्या त्रासाला कंटाळून तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, एका माजी नगरसेविका महिलेवरील बलात्काराच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…
पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…
पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…
पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…