प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…

कोल्हापूर : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीच्या घरी पहाटेच्या सुमारास जाऊन तिचा वायरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजी येथे घडली आहे. संबंधित प्रेयसीने आरडाओरडा आणि झटापट केल्याने प्रियकराने वायर टाकून पळ काढला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात दिलीप राजेंद्र पागडे (वय 34, रा. संगमनगर, तारदाळ) याच्यावर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती व संशयित आरोपी दिलीप पागडे एकमेकांना गेल्या चार वर्षांपासून ओळखतात. या ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद झाल्याने पीडित युवतीने दिलीप याच्या सोबत असलेले संबंध तोडून टाकले होते. तसेच त्याच्याशी कोणताही सबंध नसल्याचे पीडित युवतीने स्टँप पेपरवर लिहूनही घेतले होते.

दरम्यान, संबंध तोडून टाकल्यानंतरही पुन्हा संबंध जुळवण्यासाठी दिलीपचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे याच प्रयत्नातून दिलीप वारंवार पीडितेचा कामावर येता-जाता पाठलाग करत होता. दिलीपने बुधवारी (ता. ४) सकाळी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पीडितेला घरासमोर अंगणात गाठले आणि घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून ठार मारण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने पीडिताचा गळा आवळला. यावेळी युवतीने आरडाओरडा करत दिलीपला बाजूला ढकलून देत त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यामुळे संशयित आरोपी दिलीप गळ्यातील वायर तिथेच टाकून फरार झाला होता.

पीडित युवतीने फिर्याद दिल्यानंतर शहापूर पोलिसांनी दिलीप पागडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…

हृदयद्रावक! पाच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या वनरक्षकाने घेतला जगाचा निरोप…

वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून युवतीची घराबाहेरच हत्या; गावकऱ्यांनी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!