
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडयातील आरोपी २४ तासात केले जरेबंद; पाहा नावे…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दमधील मौजै च-होली खुर्द येथे पडलेल्या दरोडयातील आरोपीस २४ तासात जेरबंद करुन पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
फिर्यादी रमेश विठ्ठल थोरवे (वय ४३ वर्ष, रा. मौजै च-होली खुर्द, वडगाव रोड, सुरेश नगर, ता.खेड, जि. पुणे) हे कुटुंबासह २२/०२/२०२४ रोजी रात्री ०२.३० वा ते ०३.०० वा चे दरम्यान राहते घरी झोपलेले असताना अचानक ०५ अनोळखी व्यक्तींनी घराचा दरवाजा लाथ मारुन तोडून त्या वाटे घरामध्ये जबरदस्तीने आत प्रवेश केला. त्यांनी रमेश विठ्ठल थोरवे, त्यांची पत्नी आशा थोरवे, वडील विठ्ठल थोरवे यांना लोखंडी कोयता, लोखंडी विळा यांचा धाक दाखवून आशा थोरवे यांचे अंगावरील सोन्याचे मंगळसुत्र व कानातील टॉप्स, रमेश थोरवे यांचे पॅन्टचे खिशातील रोख रक्कम असा एकुण ९७,०००/- रुपयांचा माल जबरदस्तीने धाक दाखवून दरोडा टाकुन स्कॉर्पीओ वाहन क्रमांक एमएच-४२- बीजे-५५९६ याचेमध्ये पळून गेले होते. याबाबत आळंदी पोलिस ठाणे येथे गुरनं. ४४/२०२४, भादवि कलम ३९५, ४५२,५०६, ऑर्म अॅक्ट ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांचे मागदर्शनाखाली आळंदी पोलिस ठाणेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीतांचा शोध घेणेकामी घटनास्थळी रवाना होवून आजुबाजुस परिसराची पाहणी करुन फिर्यादीने दिलेल्या स्कॉर्पीओ वाहन क्रमांक एमएच-४२- बीजे-५५९६ याचा अत्यंत कशोसीने शोध घेवून त्यांचा माग काढून थेऊर फाटा येथे वाहन मिळून आले. त्यानंतर गाडीत असलेला चालक यास अत्यंत कशोसीने ताब्यात घेवून शोध घेवून त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव पृथ्वीराज सुखदेव चव्हाण असे सांगितले. त्यानंतर सदर आरोपीकडे इतर आरोपीबाबत तपास करता त्यांनी सदर आरोपीचे ठावठिकण्याबाबतची माहिती दिल्याने त्यानी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा माग काढून पुढीलजणांना ताब्यात घेतले.
१) कोहीनूर विशाल पवार, वय २१ वर्ष, रा. चोराची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे,
२) धिरज उत्तम चव्हाण, वय ३५ वर्ष, रा. दापोडी, केडगाव, ता.दौंड, जि.पुणे,
३) नरेश धनजी सकीरा ऊर्फ हाकला, वय २५ वर्ष, रा. चोराची आळंदी, ता.हवेली, जि.पुणे,
४) पृथ्वीराज सुखदेव चव्हाण, वय २६ वर्ष, रा. दापोडी, केडगाव, दौंड, पुणे
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल गोडसे, सहायक पोलिस निरीक्षक लोहार, पोहवा ५०५ लोणकर, पोहवा १४८५ वहिल, पोहवा ६६८ राजु जाधव, पोलिस हवालदार १४८३ कु-हे,पोलिस नाईक १९२१ सानप, पोलिस शिपाई १३०६ खेडकर, पोलिस शिपाई २२६८ पालवे, पोलिस शिपाई १९३० आडे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि लोहार हे करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…
पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…
पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई…
पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्टल जप्त…
पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

