
पहिल्या घटस्फोटातून सावरून केला दुसरा विवाह तर महिलेने…
छत्रपती संभाजीनगर : पुरुष आणि महिलेची दोघांचेही आधीच दुसऱ्यांसोबत लग्न झाले होते. मात्र, दोघांचाही संसार मोडला होता. यानंतर नात्यातीलच असल्याने नातेवाईकांनी या दोघांचे एकमेकांसोबत लग्न लावायचे ठरवले. दोघांनाही आधीच्या जोडीदाराला सोडले असल्यामुळे लग्न लावण्यात आले होते.
दोघांचा विवाह झाल्यानंतर 2016 साली त्यांना मुलगाही झाला. मात्र, यानंतर महिला नवऱ्याच्या घरी परत येण्यास तयार नव्हती. घरी येण्याआधी तिने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. माझ्या बँक खात्यात पाच लाख रूपये टाक आणि तुझं घरही माझ्या नावे कर, अशी मागणी महिलेने केली. हे ऐकून नवऱ्याला धक्काच बसला. 2019 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हाही महिलेने दाखल केला. मात्र, या प्रकरणाचा निकाल नवऱ्याच्या बाजूने लागल्यानंतर नवऱ्यासोबत चांगले वागू लागली होती.
पहिल्या घटस्फोटातून सावरेला नवरा दुसऱ्या पत्नीच्या अनेक विचित्र मागण्या ऐकून त्याला संशय येऊ लागला. त्याने तिला पहिल्या घटस्फोटाचे कागदपत्रं मागितले. मात्र, ते त्याला मिळाले नाहीत. अखेर पत्नीने पहिल्या पतीपासून घटस्फोटच घेतला नसल्याचे समोर आले. तिने घटस्फोट न घेताच लग्न केले होते आणि त्याची फसवणूक केली होती.
लग्न मंडपात प्रियकराचे कृत्य नवरदेव पाहातच राहिला अन् अखेर…
एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…
अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल…

