पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…

पुणे: पुणे पोलिसांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली असून, १२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पुणे शहरात पोलिस अलर्ट मोडवर असून, पोलिस आयुक्त नितेश कुमार यांच्या निर्णयांचा धडाका सुरूच आहे. पुणे पोलिसांनी एकाच दिवशी १२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस उप आयुक्त परिमंडळ चारमधील पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावर खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडयाची तयारी करणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, दुखापत करुन मारहाण करणे, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर अग्निशस्त्र व प्राणघातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगणे, दहशत करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी व घरफोडी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकार्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा म्हणुन संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. परिमंडळ चारचे उपायुक्त यांनी या प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ प्रमाणे ११ गुन्हेगारावर व कलम ५७ प्रमाणे ०१ गुन्हेगार असे एकुण १२ गुन्हेगारांना पुणे पोलिस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पुणे पोलिसांनी शहरातील एकूण ११० जणांना पोलिस सुरक्षा पुरवली होती. त्यापैकी ८५ जणांची पोलिस सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यासोबत अनावश्यक अशा शहरातील २३ ठिकाणांवरील देखील सुरक्षा गार्ड काढण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय स्थरावर असलेले अध्यक्ष, प्रमुख तसेच नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे तब्बल ३५० पोलिस कर्मचारी हजर झाले आहेत. परिणामी याचा फायदा पोलिसींगसाठी होणार आहे.

पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…

पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!