प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी कारागृहाबाहेर…

पुणे: गुतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या डी. एस. कुलकर्णीं यांची पाच वर्षानंतर जामिनावर सुटका झाली आहे. 2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

फेब्रुवारी 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात आली होती. ज्या कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती, त्या कायद्यानुसार जास्तीत जास्त किती दिवस या आरोपींना न्यायालयात ठेवता येतं? हा निकष न्यायालयाने पाहिला. नेमून दिलेल्या काळापेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.

डी. एस. कुलकर्णी यांच्यावर बँकांचेही जवळपास 1200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या सर्व प्रकारात बँकांचाही सहभाग असल्याचे पोलिसांना सुरुवातीला आढळून आले होते. एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली होती. सध्या डी. एस. कुलकर्णींच्या मालमत्ता विकून जो पैसा येतोय, तो आधी बँकांना दिला जात आहे. ज्या सामान्य गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्यभराची कमाई डीएसकेंकडे गुंतवली होती, त्यांना मात्र एक कवडीही मिळालेली नाही. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि डी. एस. कुलकर्णी यांच्या मालमत्तांचा लिलाव करुन जे काही पैसे येणार आहेत, ते या गुंतवणूकदारांना द्यावे आणि त्यांची देणी भागवावी, अशी मागणी आता होत आहे.

पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

बारामतीमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त पण…

पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा; बनावट नोटांची उधळण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!