लाँचवर मासेमारी करणाऱ्या ऋषिकेशला लागले होते दारूचे व्यसन…

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या ऋषिकेश सुरेश कुंभार (वय २२) याने व्यसनामुळे झालेल्या भांडणातूनच आत्महत्या केली आहे. ऋषिकेश याला दारूचे व्यसन होते. व्यसनावरून वडीलांसोबत झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केले.

ऋषिकेश याला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रुग्णालयात पुढील उपचारांकरता दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ऋषिकेश याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या प्रकाराची नोंद मुंबई येथून राजापूर पोलिस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.

ऋषिकेश हा लाँचवर मासेमारीसाठी काम करत असायचा. पण, त्याला दारूचे व्यसन लागले होते. यामुळे घरामध्ये भांडण होत असे. यातूनच त्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाचा आरोपीला दणका…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…

मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!