अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…

अहमदनगर: कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ती सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जेवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

श्रीगोंदा परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच जनावरांच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर तडीपार आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांनी हल्ला केला. आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शिवाय, पोलिसांच्या अंगावर चारचाकी वाहन घालण्याचा देखील प्रयत्न झाला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचं देखील मोठे नुकसान झाले आहे.

श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी नदीम कुरेशी ओंकार सायकर आणि सदन कुरेशी यांना अटक केली आहे. तर अतिक करेशी हा फरार झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील फोडल्या चार दानपेट्या…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

धक्कादायक! महाराष्ट्रात युवकाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण…

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

धक्कादायक! जावयाने धोंडे जेवणानंतर पत्नी आणि सासूचा केला खून अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!