विद्यार्थिनीचे अंघोळ करतानाचे फोटो काढणाऱ्या आरोपीची आत्महत्या…

ठाणे: घरा शेजारी राहणारी विद्यार्थिनी (वय १६) अंघोळ करतानाचे काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटूंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन 37 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. आरोपीवर गुन्हा दाखल होताच मित्राच्या घरी जाऊन त्याने विष प्राशन करीत आत्महत्या केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार आणि पोक्सो कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुरबाड तालुक्यातील एका गावात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपीचा विवाह झाला असून पत्नी त्याला सोडून गेली आहे. आरोपीने पीडित मुलीच्या घरच्या मागे असलेल्या बाथरूममध्ये ती अंगोळ करतानाचे फोटो त्याने आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केले. त्यानंतर तेच फोटो पीडित मुलीला दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. कुटूंबालाही मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बाथरूममध्येच 18 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यत वारंवार बलात्कार करत होता.

आरोपीच्या वाढत्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास होऊ लागला होता. तिच्या आईने तिच्याकडे अधिक चौकशी केली. तिच्यावर घडत असेलला धक्कादायक प्रकार तिने आईला सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शाळकरी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 37 वर्षीय शेजारी राहणाऱ्या आरोपीवर भादंवि कलम 376,(2)(एन ), 376 (3), 354(ए ) 354,( सी ) , 341, 504, 506, सह पोक्सो कलम 4, 6, 8, 12 नुसार 18 फेब्रुवारी 2024 रोजी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीने दुसऱ्या गावात राहणाऱ्या एका मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार…

संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी केला अत्याचार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!