पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…
पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या महिलेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले होते. यानंतर महिलेने अल्पवयीन युवकासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणी महिलेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा भागातील महिलेने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या प्रकरणी एका 28 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. 17 वर्षीय अल्पवयीन युवकाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन युवक आणि आरोपी महिला कोंढवा परिसरात राहतात. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. कोरोना काळात या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ही महिला एकटीच होती. दरम्यान जबरदस्ती केल्याची खोटी तक्रार पोलिसात देईल, अशी धमकी या अल्पवयीन मुलाला महिलेने दिली. धमकी देऊन महिलेने त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
दरम्यान, या संपूर्ण कृत्याचा तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप देखील या युवकाला काढण्यासाठी भाग पाड होती. 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. महिलेच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारची अश्लील क्लिप असल्याचे पीडित युवकाच्या कुटुंबीयांना समजले होते. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. युवकाच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…