धक्कादायक! दारू पार्टीदरम्यान मित्राचे गुप्तांग कापले अन् पुढे…

पुणे : दारू पिताना मित्राने शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या युवकाने ब्लेडने सपासप वारून करून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृत युवकाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भगवान रोकडे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्या गायकवाड याला अटक केली आहे. हत्या झालेला गणेश आणि आरोपी अभिषेक याच्यासह एक अल्पवयीन मुलगा हे तिघेजण मित्र होते. तिघेही चिंचवड रेल्वे स्थानकाच्या परिसरातील मैदानात दारू पित होते. गणेश आणि अभिषेकमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे गणेशने त्याला शिवीगाळ केली होती. शिवीगाळ केल्यामुळे अभिषेक आणि त्याच्या साथीदार असलेल्या अल्पवयीन मुलाने गणेशवर ब्लेडने वार केले. शिवाय, गणेशचे गुप्तांग कापून टाकले आणि मृतदेह विहिरीत फेकून दिला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी अभिषेकला अटक केली असून त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…

युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!