Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू
धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव परिसरात झालेल्या अपघातात साक्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

मनोज जरांगे यांच्या गावात दगडफेक, पोलिस घटनास्थळी
बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या गावामध्ये किरकोळ दगडफेक झाली आहे. दगडफेकीनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण आहे. या दगडफेकीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, दरम्यान दगडफेकीनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नागपूरमध्ये प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या
नागपूरः नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या आहे. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

मुंबईत झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
मुंबईः एका मेडिकल कर्मचाऱ्याने झोपेची गोळी न दिल्याने दोघा जणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये प्रख्यात बिल्डर असल्याचे भासवत मोठी फसवणूक
नाशिक : गुंतवणूकदारांना मोठमोठी प्रलोभने देऊन कमी किंमतीत फ्लॅट देतो, असे आमिष दाखवून सुमारे 3 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक करून बिल्डर फरार झाला आहे. बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अहमदनगरच्या पालिका आयुक्तांनीच मागितली तब्बल 9 लाखांची लाच
अहमदनगर: अहमदनगरच्या महापालिका आयुक्तांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल 9 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, एसीबीची रेड पडणार याची कुणकुण लागताच ते फरार झाले आहेत.

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून दोघांना अटक
पाटणा (बिहार): नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने दोघांना पाटणा येथून अटक केली. मनीष कुमार आणि आशुतोष कुमार अशी या दोघांची नावे असून परीक्षेपूर्वी दोघांनी उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिल्याचा संशय आहे.

पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून फसवणूकीचे तीन गुन्हे उघडकीस
पुणे : पिंपरी-चिंचवड सायबर सेलच्या पथकाने एका आठवड्यामध्ये चार कोटी रुपयांची फसवणूक झालेले तीन गुन्हे उघडकीस आणले असून आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

जळगावमध्ये मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगावः जळगाव शहरातील एक १७ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ध्रुव ललित बऱ्हाटे (वय १७, रा.सरस्वती नगर, भुसावळ रोड जळगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन आश्रमात युवतीची हत्या
चंद्रपूर: बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरु केलेल्या आनंदवन आश्रमात आरती चंद्रवंशी (वय २५) या युवतीची हत्या झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!