
कु्र्ला बस अपघातातील बस चालक मोरेची पत्नी आणि मुलाने सांगितले की…
मुंबई: मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
कुर्ला अपघात प्रकरणी बेस्ट बसचा चालक संजय मोरे याला कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. न्यायालयात आज हजर केले जाणार आहे. मात्र या प्रकरणात संजय मोरे यांची काहीही चूक नाही. ते कधीच मद्यपान करत नाही. चालक म्हणून ही अनेक वर्ष ते काम करीत होते, बेस्टमध्ये चार वर्षांपासून ते चालक होते, या बस चालवण्याचे ट्रेनिंग घेतले होते. मात्र बसमध्येच तांत्रीक बिघाड असावा, अशी प्रतिक्रिया चालक संजय मोरे याच्या कुटुंबियाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
चालक संजय मोरे यांचा मुलगा म्हणाला, ‘संजय मोरे मद्यपान करुन गाडी चालवत होते, या बातम्या खोट्या आहेत. माझे बाबा मद्यपान कधीच करत नाही. त्यांच्याकडे 1989 पासून गाडी चालवण्याचा परवाना आहे. काहीजण बोलताय 1 डिसेंबरपासून बस चालवायला घेतली, हे पूर्ण खोटं आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोरोनाच्या लॉकडाऊननंतर माझे बाबा बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पाहतोय ते गाडी चालवत आहेत. इतके दिवस काही अपघात झाला नाही आणि आजचं कसा झाला?, ते अत्यंत सावधगतीने गाडी चालवात. त्यामुळे काल जो अपघात झाला तो बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच झाला आहे.’
संजय मोरे याची पत्नी म्हणाली, नेहमीप्रमाणे कामावर निघतात, तसेच ते गेले. आम्ही दोघंही नेहमीप्रमाणे आमच्या स्टॉलवर गेलो. ते तिकडून 1 वाजता कामावर जायला निघाले. ते नेहमी वेळेवर जातात. माझा नवरा दारु कधीच घेणार नाही, कधीही ते मान वर करुनही बोलले नाही. आज माझ्या लग्नाला 23 वर्षे झाली. पण अजूनपर्यंत कधीही अपघात झाला नव्हता. माझा नवरा संजय मोरे निर्दोष आहे, त्यांची नक्की सुटका होईल. कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट बघितलेले नाही. काल जी घटना झाली, ते चुकून झाली आहे. त्यात काय करणार…तुमच्या गाड्या व्यवस्थित नाही. बसचा काहीतरी दोष असावा. माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाही.’
मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे…
1. आफरीन अब्दुल सलीम शाह (वय 19)
2. अनम शेख (वय 20)
3. कनिस फातिमा गुलाम कादिर (वय 55)
4. शिवम कश्यप (वय 18)
5. विजय विष्णू गायकवाड (वय 70)
अन्य दोन जणांची नावे समजू शकलेली नाहीत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कुर्ला बेस्ट बस अपघातातील चालकाचा खुलासा; म्हणून घात झाला…
मुंबईतील बेस्ट अपघातातील मृतांचा आकडा वाढला; पाहा मृतांची नावे…
मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…
मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

