वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द अन्…

पुणे: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा साडेसहाशेहून अधिक लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव दिले असून, त्यातील 195 लायसेन्स रद्द झाले आहेत. यामुळे संबंधित चालकांना लायसन्ससाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. कारवाई झालेल्या चालकाने नव्याने लायसन्स न काढता वाहन चालवल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांकडून परिवहन विभागाच्या वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. यामध्ये रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, नो एन्ट्रीमध्ये गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, गर्दी असताना फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे.

वाहन परवाना रद्द झाल्यास वाहन चालकाने तीन महिने वाहन चालवता येणार नाही. कारवाई झालेल्या चालकाने नव्याने लायसन्स न काढता वाहन चालवल्यास 10 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. वाहन चालकाला वाहन रद्द झाल्यास वाहन चालकाला पूर्वीप्रमाणे प्रक्रिया कर परवाना काढावा लागणार आहे.

दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे,इतर नियम तोडल्यास वाहनचालकावर परवाना निलंबित होण्याची कारवाई होऊ शकते. यामुळे वाहतूक शाखेने कठोर कारावाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!